विश्वचषकात सर्वाधिक धावा आणि बळी घेण्यात ‘हे’ खेळाडू आहेत अव्वल


लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा ऐतिहासिक अंतिम फेरीचा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर रविवारी पार पडला. इग्लंड संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत चौकार षटकारांच्या निकषावर न्यूझीलंडचा पराभव केला. बेन स्टोक्सला या सामन्यामध्ये सामनावीर तर मालिकावीराचा किताब न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला देऊन पुरस्कृत करण्यात आले.


काही फलंदाजांनी या स्पर्धेमध्ये खोऱ्याने धावा काढल्या त्यामध्ये यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. ९ सामन्यात ८१ च्या सरासरीने त्याने ६४८ धावा केल्यामुळे सर्वोत्तम फलंदाजासाठी गोल्डन बॅट देऊन सन्मानित करण्यात आले. तर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर फक्त एका धावामुळे रोहितच्या पिछाडीवर पडला आहे. ७१ च्या सरासरीने त्याने ६४७ धावा केल्या आहेत.


तर या स्पर्धेत काही गोलंदाजांनी फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले होते. मिचेल स्टार्क आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत प्रथम राहिला आहे. त्याने या स्पर्धेत एकूण २७ बळी घेतले आहेत. त्याला त्याच्या या कामगिरीमुळे सर्वोत्तम गोलंदाजीसाठी गोल्डन बॉल देऊन सन्मानित करण्यात आले. तर उपविजेत्या संघाचा लॉकी फर्ग्युसन २१ बळी घेत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

Leave a Comment