टरबाइन इंजिनच्या मदतीने उडणाऱ्या या ‘फ्लाइंग सोलजर’चा व्हिडीओ एकदा बघाच


युरोप आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभुमीवर फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मैक्रॉन यांनी रविवारी वार्षिक बॅस्टिल दिनाच्या संचालनामध्ये युरोपीय सैन्यांबरोबर प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. जर्मनीच्या चांसलर एंजेला मार्केल, नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूटा यांनी शॉज-एलिसीज येथे इमॅन्युएल मैक्रॉन यांच्याबरोबर संचालन बघितले. मैक्रोन यांनी चीफ ऑफ स्टाफ जनरल फ्रांकोई लिकोंत्रे यांच्याबरोबर कारमध्ये परेड करत निरिक्षण देखील केले. यावेळी 4000 हजार पेक्षा अधिक सशस्त्र सैनिकांनी मार्च केला. यामध्ये युरोपियन सैनिकांचे रेजिमेंटचा देखील समावेश होता.

यावेळी सगळ्यात प्रमुख आकर्षण केंद्र होते ते म्हणजे ‘फ्लाइंग सोलजर’. फ्रांसच्या फ्रँकी जपाटाने टरबाइन इंजिनच्या मदतीने आकाशात भरारी घेतली. याचबरोबर त्यांनी अनलोडेड गन देखील स्वतः बरोबर ठेवली होती.


फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मैक्रॉन यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, आम्हाला आमच्या सैनिकांवर गर्व आहे. ते आधुनिक आणि नाविन्यपुर्ण आहेत.

युरोपिय देशांकडून रक्षा सहयोग हे मैक्रॉन यांच्या प्रमुख विदेशी धोरणांपैकी एक आहे. 2017 मध्ये संचालनामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे प्रमुख पाहुणे होते.

जर्मनीच्या ए400एम परिवहन विमान आणि स्पेनच्या सी130 बरोबरच दोन ब्रिटिश चीनुक हॅलिकॉप्टरने देखील आकाशात उड्डाण घेतले. ब्रिटनच्या पंतप्रधान टेरेसा मे या संचालनामध्ये सहभागी होण्याची शक्यता होती. मात्र त्या आल्या नाहीत. या संचालनामध्ये 4300 सैनिक, 196 वाहन, 237 घोडे, 69 विमान आणि 39 हॅलिकॉप्टरने सहभाग घेतला.

Leave a Comment