जॅकी श्रॉफच्या वडिलांनी केली होती, धीरूभाई अंबानी अब्जाधीश होणार अशी भविष्यवाणी


रिलायंस ची मुहूर्तमेढ घालणारे धीरूभाई अंबानी जगावर राज्य करणार, अब्जाधीश होणार याची भविष्यवाणी एका ज्योतिषाने फार पूर्वीच म्हणजे ४१ वर्षापूर्वी केली होती आणि हे ज्योतिषी म्हणजे अन्य कुणी नव्हते तर ते होते बॉलीवूड कलाकार जॅकी श्रॉफचे वडील काकुलाल श्रॉफ. खुद्द जॅकीनेच हि माहिती एक टीव्ही मुलाखतीत दिली होती. काकुलाल ज्योतिष व्यवसाय करून घर चालवीत असत आणि त्या काळी धीरूभाई आणि त्यांच्या पत्नी कोकिलाबेन अनेकदा त्यांच्याकडे येत असत. त्यावेळी धीरूभाई व्यवसायात जम बसावा म्हणू धडपड करत होते .


गरिबीच्या झळा धीरूभाई यांचा परिवार झेलत होता. वडील शाळेत शिक्षक. घराची परिस्थिती बेताची म्हणून जेमतेम १० पर्यंत शिक्षण घेऊन धीरूभाई मुंबईत आले आणि त्यांची काही तरी व्यवसाय करण्याची धडपड सुरु झाली. हा काळ दीर्घ होता. १९९७ साली त्यांनी रिलायंसचा पाया घातला होता. रिलायंस हा भारतातील आणि जगातील बड्या उद्योगामधला एक उद्योग बनला असून आज रिलायंसची वेगळी ओळख देण्याची काहीच गरज राहिलेली नाही. धीरूभाई अंबानी यांनी एकट्याच्या हिमतीवर हा उद्योग खडा केला तो अपार मेहनतीने. मात्र त्याच्या हा प्रवास सोपा नव्हता कारण त्यांना सुरु केलेल्या विविध व्यवसायात अनेक अडचणी येत होत्या. मुंबईत काही व्यवसाय सुरु करण्यासाठी ते गुजराथ मधील त्यांच्या छोट्या चोरवड गावातून आले तेव्हा मुंबईत त्यांनी भेळपुरी विक्रीचा व्यवसायही केला होता.

काकुलाल यांच्याकडे धीरूभाई आले तेव्हा त्यांनी तू जगावर राज्य करणार असे भविष्य सांगितले तेव्हा धीरूभाई नुसते हसले होते अशी आठवण जॅकी सांगतो. रिलायंसची सुरवात साडेतीनशे चौरस फुटाच्या खोलीत केली गेली होती. आजही अंबानी परिवाराशी जॅकीचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

Leave a Comment