न्यूझीलंडचा हा दिग्गज खेळाडू धुत आहेत सध्या गाड्या!


यंदाच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ हा उपांत्य फेरीपर्यंत नक्की पोहचेल असे आपल्यापैकी अनेकांना वाटले होते. पण अंतिम फेरीत ते धडक मारतील असा विचार कोणीही केला नव्हता. उपांत्य फेरीच्या सामन्या बलाढ्य भारतीय संघाला लोळवत न्यूझीलंडने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आता उद्या त्यांचा सामना यजमान इंग्लंड संघासोबत होणार आहे. अनपेक्षितपणे अंतिम फेरीत पोहोचलेला हा संघ कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून राहत नाही . संघातील प्रत्येक खेळाडू फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात छोटे-छोटे योगदान देतो. त्याचा परिणाम विरुद्ध संघाचा पराभव होतो.

विराट, धोनी, वॉर्नर सारखे न्यूझीलंडच्या संघातील खेळाडू प्रसिद्ध नाहीत. स्वत: कर्णधार विल्यिमसन फलंदाजी आणि नेतृत्वाबाबत विराट कोहलीपेक्षा अनेक अर्थाने पुढे आहे. तो तरी देखील लो प्रोफाईल आहे. केवळ क्रिकेट या संघातील अनेक खेळाडू खेळत नाहीत तर एक सामान्य व्यक्तीसारखे आयुष्य जगतात. एका सामान्य व्यक्तीला ज्या समस्या येतात तशाच समस्या या क्रिकेटपटूंना निवृत्तीनंतर येतात. या अडचणी एवढ्या गंभीर असतात की निवृत्तीनंतर घर चालवण्यासाठी पैसे कमी पडतात. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटूंना प्रचंड पैसे मिळतात. पण न्यूझीलंडमधील क्रिकेटपटूंची अवस्था वेगळी आहे. विराट, मॉर्गन आणि फिंच या खेळाडूसारखे मानधन या संघातील खेळाडूंना मिळत नाही.

तुम्हाला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस केर्न्स आठवत असेल किंवा मॅथ्यू सिंक्लेअर या दोघांनी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. पण त्यांना निवृत्त झाल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मॅच फिक्सिंगचा आरोप झालेल्या केर्न्सला न्यायालयीन लढाई लढावी लागली होती. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती देखील बिघडली. मॅच फिक्सिंगच्या आरोपातून केर्न्स सुटला खरा पण त्याला वैयक्तिक आयुष्यात मोठा संघर्ष करावा लागत आहे. 44 वर्षीय केर्न्सने घर चालवण्यासाठी ऑकलँडमध्ये बस धुण्याचे आणि ट्रक चालवण्याचे काम केल्याचे वृत्त तेथील स्थानिक मीडियाने दिले आहे.

मॅथ्यू सिंक्लेअरने कसोटी पदार्पणातच द्विशतक ठोकले होते. त्याच्या क्रिकेट निवृत्तीनंतरचे आयुष्य मात्र खडतर झाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2013मध्ये निवृत्ती घेणारा मॅथ्यू अनेक महिने बेरोजगार होता. आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे त्याच्याकडे कुटुंबाचा दैनंदिन खर्च चालवण्यासाठी पैसे नव्हते. शिक्षणपूर्ण केले नसल्यामुळे मॅथ्यूला नोकरी देखील मिळाली नाही. अखेर नेपिअर येथे एका रियल इस्टेटमध्ये सेल्स पर्सन म्हणून त्याला नोकरी मिळाली.

Leave a Comment