अरे देवा…! पुरुषाच्या शरीरात आढळले चक्क गर्भाशय


मुंबई – मुंबई शहरातील प्रसिद्ध जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल पुरुषाच्या शरीरात चक्क महिलेचे गर्भाशय आढळून आले आहे. २ वर्षापूर्वी संबंधित २९ वर्षीय तरुणाचे लग्न झाले होते. तो त्याला बाळ होत नसल्याने तपासणीसाठी आला असता हा प्रकार समोर आला आहे. स्त्री अवयव त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आले.

जेजे रुग्णालयात संबंधीत तरुण तपासणीसाठी आला होता. डॉ. गीते यांनी त्यावेळी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता पोटात त्याचे दोन्ही अंडाशय होते. त्यानंतर तो स्त्री आहे की पुरुष आहे याची चाचणी करण्यात आली. पण लैंगिकरित्या तो पुरुषच होता. अंडाशय अंडकोषामध्ये आणण्यासाठी त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. पण एक स्त्रीचा अवयव त्याच्या अंडाकोषाला चिकटलेला असल्यामुळे एमआरआय करण्यात आले. त्यानंतर तो स्त्रीचाच अवयव म्हणजे गर्भाशय असल्याचे स्पष्ट झाले.

त्या गर्भाशयाला अंडाशयापासून निघालेली वीरनलिका चिकटलेली होती. अंडाशय अंडकोषामध्ये गर्भाशय काढल्याशिवाय आणता येत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला गर्भाशय काढण्यात आले. त्यानंतर अंडाशय अंडकोषामध्ये नेण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली, असल्याचे डॉक्टर गीते यांनी सांगितले. जगभरात आतापर्यंत २०० पुरुषांच्या शरीरात गर्भाशय आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, जेजे रुग्णालयात घडलेली ही पहिलीच घटना आहे.

Leave a Comment