39 कोटींचे ड्रग्स घेऊन जाणाऱ्या तस्करांना कोस्ट गार्ड्सने फिल्मी अंदाजात पकडले


अमेरिकेच्या कोस्ट गार्ड्सने करोडो रुपयांचे ड्रग्स घेऊन फरार होण्याचा प्रयत्न करत असलेल्या ड्रग तस्करांना फिल्मी स्टाईलमध्ये पकडले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह4 ड्रग तस्कर पाणबुडी सारख्या जहाजेमध्ये लपून पळत होता. तरी देखील वाचू शकला नाही व पकडला आहे. या संबंधीत व्हिडीओ अमेरिकन कोस्ट गार्ड्सने रिलीज केला आहे. आता या तस्कराच्या विरोधात फ्लोरिडाच्या के टैंपा बेमध्ये केस दाखल करण्यात आली आहे. पाणबुडी सारख्या दिसणाऱ्या या जहाजेला नार्को-सबमरींन्स म्हटले जाते. या जहाजांमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्स लपून नेल्या जातात.

कोस्ट गार्डंना अशा प्रकारच्या जहाजांना पकडण्यात आतापर्यंत अपयश आले आहे. मात्र 18 जून रोजी कोलंबियन आणि इक्वाडोरान कोस्ट यासारख्याच जहाजेला पकडण्यात कोस्ट गार्डला यश आले होते. अमेरिकन कोस्ट गार्ड कटर मुनरोला हे यश प्राप्त झाले असून, आपल्या पहिल्याच प्रयत्नात कोस्ट गार्डला हे जहाज पकडण्यात यश आले आहे. या जहाजेवर दोन छोटी नाव न हॅलिकॉप्टर होते. दोन्ही नावे वरील सैनिकांनी तस्करांना घेरले होते. तर हॅलिकॉप्टर या सबमरीनवर लक्ष ठेऊन होते.
व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
कोस्ट गार्ड्सचे सैनिक नावेवर बसून सबमरिनचा पाठलाग करत होते. त्यांच्या हेल्मेटवर लावलेला कॅमेरा संपुर्ण ऑपरेशन रेकॉर्ड होत होते. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येते की, तस्कर पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना यश आले नाही. गार्ड्सने त्यांना त्यांची पाणबुडी थांबवण्याचे देखील आदेश दिले. अखेर सबमरीन न थांबल्यावर गार्ड्सने बंदुक आणि नाइट विजन गॉग्ल घेत पाणबुडीवर उतरण्याचा निर्णय घेतला. तीन गार्ड्स या सबमरीनवर चढले. त्यानंतर एका तस्कराने बाहेर येत स्वतःला त्यांच्या स्वाधीन केले.

या नार्को सबमरीनमध्ये 17,000 पाउंड कोकेन होते व याची किंमत 539 मिलियन डॉलर असल्याचे सांगितले जाते. कोस्ट गार्डचे प्रवक्ता लेफ्टिनंट कंमाडर स्टीफन ब्रिकेंनी सांगितले की, ही सबमरीन विशेष आहे. पहिल्याच प्रयत्नात याला पकडणे ही एक विशेष घटना आहे. 18 जूनपासून आतापर्यंत कोस्ट गार्डने आतापर्यंत 14 तस्करांना पकडले आहे.

ब्रिके यांनी सांगितले की, गस्तीवर असलेल्या दलाल वर्षातून केवळ एकदा किंवा दोनदाच नार्को सबमरिन दिसते. यावर चढणे ही अवघड गोष्ट असते. याचबरोबर तस्कारांकडे हत्यार देखील असू शकते. त्याचबरोबर त्यांना पकडल्यावर ते पाणबुडीचा एक एक वॉल्व खोलतात. जेणेकरून पाणबुडीत लगेच पाणी शिरते. त्यामुळे त्यांना पळून जाणे सहज शक्य होते. अशा परिस्थितीमध्ये कोस्ट गार्डसकडे केवळ 2 मिनिटे असतात. या 2 मिनिटात त्यांना निर्णय घ्याचा असतो की, जहाजेला डुबून द्यायचे आहे की त्यांना पकडायचे आहे.

Leave a Comment