एवढ्या रुपयात विकला गेला भारत-पाकिस्तान सामन्यात वापरलेला चेंडू


मुंबई : प्रत्येक भारतीयांसाठी भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना खास असतो. प्रत्येकजण या सामन्यासाठी वेळात वेळ काढून हा सामना पाहण्यासाठी उत्साहित असतो. याशिवाय क्रिकेट चाहत्यासाठी या सामन्यातील प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची असते. विश्वचषक स्पर्धेत झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात वापरण्यात आलेल्या चेंडूची विक्री करण्यात आली आहे. तब्बल 1.5 लाख रुपयांना हा चेंडू विकण्यात आला आहे. हा चेंडू एका व्यक्तीने या रोमांचक सामन्याची आठवण राहावी म्हणून विकत घेतला आहे.

या विश्वचषक स्पर्धेमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत भारताने विजय मिळवला होता. 89 धावांनी भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. या सामन्यात वापरण्यात आलेला चेंडू 1.5 लाख रुपयांना विकला गेला आहे. हा चेंडू एका क्रिकेट चाहत्याने विकत घेतला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात वापरण्यात आलेला टॉसही विकत घेण्यात आला आहे.

ऑफशिलमेमोराबिला डॉट कॉमवर हा चेंडू विक्रीसाठी होता. या वेबसाईटवरुन हा चेंडू 2150 डॉलर भारतीय रुपयात 1.5 लाख रुपयाला विकला गेला. तसेच टॉसची किंमत 1450 डॉलर (एक लाख), तसेच सामन्यातील स्कोअरशीट 1100 डॉलर (77 हजार रुपये) मध्ये विकण्यात आली. एक आठवण म्हणून क्रिकेट चाहत्यांनी या वस्तू मोठी रक्कम देऊन खरेदी केल्या.

ऑफिशलमेमोराबिला डॉट कॉमवरुन खरेदी करायची असल्यास तुम्हाला वेबसाईटवर जाऊन लॉग ईन करावे लागेल. यानंतर तुम्हाला एखादी वस्तू आवडल्यास त्याचे पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमचा पत्ता मेमोराबिलाच्या डिलीव्हरीसाठी द्यावा लागेल.

Leave a Comment