स्टेट बँकेच्या ‘या’ सुविधा ग्राहकांना 1 ऑगस्टपासून मिळणार मोफत


नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आता त्यांच्या ग्राहकांसाठी पैशांच्या देवाण-घेवाणीच्या कार्यप्रणातील आयएमपीएस (IMPS) सेवा 1 ऑगस्टपासून पूर्णपणे मोफत करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर लवकरच एनईएफटी आणि आरटीजीएससाठी आकारण्यात येणारे शुल्क सुद्धा रद्द करण्यात येणार आहेत.

आरबीआयकडून या सुविधांसाठी यापूर्वी सुट देण्यात आली होती. त्यानंतर आता एसबीआय सुद्धा आपल्या ग्राहकांना या सुविधा मोफत देणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एनईएफटी, आरटीजीएस आणि आयएमपीएस या सुविधा बँकेकडून दिल्या जातात. तर आता आयएमपीएस सुविधा मोफत करणार असल्याचा निर्णय स्टेट बँकने घेतला आहे.

Leave a Comment