समीरा रेड्डीला कन्यारत्नाचा लाभ


दुसऱ्यांदा बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी ही आई झाली आहे. समीराला शुक्रवार, 12 जुलै रोजी कनारत्न प्राप्त झाले. खुद्द समीराने सोशल मीडियाद्वारे ही गोड बातमी शेअर केली आहे. तिने फोटोच्या माध्यमातून मुलीची खास झलकही शेअर केली.

समीराने फोटो शेअर करत लिहिले की, आमच्या घरी आज सकाळी एका लहान परीचे आगमन झाले आहे.


समीराने शेअर केलेल्या या गोड बातमीनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यापूर्वी समीराला एक लहान मुलगा आहे. समीरा काही दिवसांपूर्वी अंडरवॉटर प्रेग्नंसी फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. सोशल मीडियात समीराचे हे प्रेग्नंसी फोटोशूट चांगलेच गाजले. समीराने 2002 मध्ये बॉलिवूड पर्दापण केले. त्याचबरोबर तिने तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटातही काम केले आहे. लग्नानंतर मात्र सिनेसृष्टीला बाय म्हणत समीरा संसारात रमली.

Leave a Comment