इंग्लंडच्या मुख्य खेळाडूवर बंदी घालणार आयसीसी ?


बर्मिंगहॅम : आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला नमवत 1992नंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 224 धावांवर अडवले. दरम्यान इंग्लंडने हे आव्हान 32.1 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. इंग्लंड 1992नंतर प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. इंग्लंडचा रविवारी अंतिम सामना न्यूझीलंड विरोधात होणार आहे. दरम्यान, इंग्लंडला या सामन्याआधी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आयसीसीकडून इंग्लंडच्या मुख्य खेळाडूवर बंदी घातली जाऊ शकते.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जेसॉन रॉयने 65 चेंडूंत 85 धावा केल्या. मात्र, इंग्लंडचा सलामीवर रॉयने या सामन्यात पंचांशी हुज्जत घालून स्वतःवर संकट ओढावून घेतल्यामुळे आयसीसीने रॉयला शिक्षा सुनावली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयने सलामीवीर जॉनी बेअरस्टो यांच्यासह 124 धावांची भागीदारी केली.

85 धावांवर जेसॉन रॉय खेळत असताना, रॉयला 20 व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आले. बॅट आणि चेंडू यांच्यात काहीच संपर्क झाला नाही, तरीही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अपील केले, त्यानंतर, पंच कुमार धर्मसेनाने त्याला बाद ठरवले. त्यानंतर रॉयने तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली. आयसीसीने या प्रकरणी रॉयला शिक्षा सुनावली आहे. दरम्यान रॉयला सामना बंदी नाही तर मानधनातील 30 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.

Leave a Comment