आर्यन खानच्या आवाजातील ‘द लायन किंग’ चा टीझर रिलीज


वाल्ट डिज्नी स्टूडियोज प्रस्तुत ‘द लायन किंग’ या चित्रपटात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख याने आपला आवाज दिल्याचा टीझर याआधीच रिलीज झाला होता. पण या चित्रपटाचा दुसरा टीझर आता रिलीज करण्यात आला आहे. यात शाहरुखचा मुलगा आर्यनने ‘सिंबा’ या पात्रासाठी आपला आवाज दिल्याचा दिसत आहे. शाहरुखने नुकताच आपल्या ट्विटर अकाउंट हा टीझर पोस्ट केला. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी चित्रपटातील बाप लेकांसाठी ख-या आयुष्यातील बापलेकांनी म्हणजेच शाहरुख आणि आयर्नने आपला आवाज दिल्याने चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे.

सिंबासाठी आर्यनचा आवाज खूपच जबरदस्त वाटत आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही त्याचा आवाज ऐकाल तेव्हा तुम्हाला शाहरुखच बोलतो आहे असे वाटेल. ही पोस्ट शेअर करून शाहरुखने ‘मेरा सिंबा’ असे लिहिले आहे.


शाहरुखने याआधी या चित्रपटाचा पहिला टीझर शेअर केला होता. शाहरुख ज्यात मुफासा या पात्रासाठी आपला आवाज दिल्याचे दिसत असल्यामुळे शाहरुख आणि आर्यनचा आवाज एकत्र ऐकण्याची संधी प्रेक्षकांना या चित्रपटाच्या निमित्ताने मिळणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक जॉन फेवरो हे असून ‘द लायन किंग’ च्या हिंदी चित्रपटाची पटकथा मयूर पुरी यांनी लिहिली आहे. सिंबाच्या मूळ कथेला जराही न बदलता या चित्रपटाची निर्मिती जॉन फेवरो यांनी केली आहे. हा चित्रपट 19 जुलैला इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेमध्ये प्रदर्शित होईल.