तापसीने केला एक अनोखा सवाल


लवकरच अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यांनी आपल्या आगामी ‘सांड की आँख’ चित्रपटाचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वीच पूर्ण केल्यानंतर तापसीने आता एक व्हिडिओ शेअर करत दादीयो का स्वागत नहीं करोगे? असा सवाल विचारला आहे.


हा चित्रपट उत्तर प्रदेशमधील जोहरी गावात राहणाऱ्या ८६ वर्षीय चंद्रो तोमर आणि ८१ वर्षांची त्यांची नणंद प्रकाशी यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. ‘रिव्हॉल्वर दादी’ म्हणून या दोघींनाही ओळखले जाते. या दोघींनी ७००हून अधिक पदके विविध स्पर्धांमध्ये जिंकली आहे. भूमी आणि तापसी चित्रपटात प्रकाशी आणि चंदो तोमर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाचा टीझर आज रिलीज केला जाणार आहे. अनुराग कश्यप आणि निधी परमारने ‘सांड की आँख’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment