‘ये रे ये रे पैसा २’ चा टीजर रिलीज


संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ने गेल्या वर्षी 2018 च्या सुरूवातीला प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवरही चांगली कमाई केली होती. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘ये रे ये रे पैसा २’ रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी अण्णा परत येतो अशी कॅची टॅगलाईन सोशल मीडियात व्हायरल झाली होती. ती टॅगलाईन या चित्रपटासाठीच होती ते आता समोर आले आहे. नुकताच”ये रे ये रे पैसा २” या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. लंडनमध्ये या चित्रपटाचे जवळपास ९० टक्के चित्रीकरण झाले आहे.

हेमंत ढोमेने “ये रे ये रे पैसा २” या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. बॉक्स ऑफिसवर “ये रे ये रे पैसा” या चित्रपटाने धमाल उडवून दिली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला गुंतवून ठेवणारं कथानक, दमदार विनोद, उत्तम स्टारकास्टमुळे डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाला आता लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमेने “ये रे ये रे पैसा २” च्या रुपात पुढे नेले आहे.

या चित्रपटात संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर असे उत्तमोत्तम कलाकार आहेत. टीजरमधून या चित्रपटात वेगवान कथानक पहायला मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे. अण्णा परत आल्यानं आता काय धमाल उडणार याचं उत्तर चित्रपटातच मिळेल. हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment