अभिनेता जॉन अब्राहम लवकरच त्याच्या आगामी आणि बहुचर्चित ‘बाटला हाऊस’ या चित्रपटाच्या माध्यमातून भेटीला येणार काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे दोन टीझर रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर आता चित्रपटाचा उत्कंठा वाढविणार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
अखेर बहुप्रतिक्षित बाटला हाऊसचा ट्रेलर रिलीज
ज्या प्रकारे बाटला हाऊसमध्ये नेमके काय घडले होते, असा पहिल्या टीझरमधून प्रश्न उपस्थित झाला होता; त्याचप्रमाणे चित्रपटाच्या दुसऱ्या टीझरमधूनही असेच काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर या प्रश्नांची उत्तरे ट्रेलरमधून मिळत आहेत. जॉन अब्राहम चित्रपटात पोलीस अधिकारी सुधीर कुमार यादव यांची भुमिका साकारत आहे.
दिल्लीतील जामियाँ नगर येथे इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांविरोधात जवळपास दहा वर्षांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. ‘बाटला हाऊस’ असे नावही या कारवाईला देण्यात आले होते. त्याच घटनेचा आधार घेत जॉनच्या या चित्रपटाचे कथानक साकारण्यात आले आहे.
निखिल अडवाणी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, क्रिशन कुमार आणि जॉन अब्राहम याने केली आहे. तर, अभिनेत्री मृणाल ठाकूर हीसुद्धा या चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जॉन पुन्हा एकदा रुबाबदार अधिकाऱ्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे चाहत्यांसाठी ही परवणीच असेल. १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.