बॉटल कॅप चॅलेंज – केवळ आवाजने उघडून दाखवले तिने झाकण


सोशल मीडियावर कोणत्या तरी चॅलेंजची क्रेज नेहमीच सुरू असते. सध्या बॉटल कॅप चॅलेंजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेक लोक राउंड किकने बॉटलचे झाकण खोलत आहेत. तर कोणी हाताने झाकण खोलत हे चॅलेंज पुर्ण करत आहेत. बॉलिवूडचा अभिनेत टायगर श्राँफने तर डोळ्यावर पट्टीबांधून हे चॅलेंज पुर्ण केले. मात्र सध्या या चॅलेंजशी संबंधीत एक व्हिडीओ  सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये त्या महिलेने बॉटलला हात देखील न लावता झाकण काढले आहे. हा व्हिडीओ कोणत्याही जादूगरचा नसून, अमेरिकन गायक मारिया कैरीचा आहे. व्हिडीओमध्ये मारियाने बॉटलला हात न लावता केवळ आपल्या आवाजाच्या जोरावर बॉटल कप चॅलेंज पुर्ण केले आहे.

View this post on Instagram

Challenge accepted! #bottlecapchallenge

A post shared by Mariah Carey (@mariahcarey) on


आपल्या आवाजाने हॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मारियाने हे चॅलेंज स्विकारत हटके पध्दतीने पुर्ण केले आहे. हा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. व्हिडीओ बघून कोणालाही वाटेल की, मारिया किक मारून हे चॅलेंज पुर्ण करेल. मात्र तिने काहीही न करता झाकण उघडून दाखवले.

1969 मध्ये न्युयॉर्कमध्ये जन्म झालेली मारिया आपल्या गाण्यासाठी आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने तिला ‘साँगबर्ड सुप्रिम’ असे नाव दिले आहे. मारिया अमेरिकन ऑयडॉलमध्ये जज भुमिकेत देखील दिसली आहे.

या बॉटल कप चॅलेंजची सुरूवात कजाकिस्तानचा ताइक्वांडो चॅम्पियन फरावी दवचलिन ने फारा किक्स चॅलेंजच्या नावाने केली होती. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नाव बदलण्यात आले. अनेक लोकांनी हे चॅलेंज पुर्ण करत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केले आहेत.

Leave a Comment