‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर रिलीज


नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षकांना असलेली प्रतीक्षा अखेर संपली असून दुसऱ्या सीझनमध्ये पहिल्या सीझनमधील अनुत्तरित राहिलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर मिळणार आहे. या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. 15 ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन स्ट्रीम होईल.

जुन्या गोष्टीच्या रिवाईंडने दुसऱ्या सीझनच्या ट्रेलरची सुरुवात होते. यानंतर वेब सिरीजच्या नव्या व्यक्तिरेखा समोर येतात. नवाजुद्दीन सिद्धीकी, पंकज त्रिपाठी, सैफ अली खान हे त्रिकुट 2 मिनिटे 10 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त लूकमध्ये दिसतात. नेटफ्लिक्स इंडियाने कॅलेंडर निकालो भाईयों और बहनो, सेक्रेड गेम्स का रिलीज डेट आएला है, असे म्हणत वेब सिरीजचा ट्रेलर आपल्या ट्विटर हॅण्डरवर शेअर केला आहे.

अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीजनचे दिग्दर्शन केले होते. हा सीझन यंदा अनुराग कश्यप आणि नीरज घेवान यांनी दिग्दर्शित केला आहे. पहिला सीझन संपल्यानंतर पुढे काय होणार या प्रश्नाने सर्व प्रेक्षकांना व्याकुळ केले होते. पण आता या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना 15 ऑगस्टपासून मिळणार आहे.

Leave a Comment