सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ


मुंबई – सत्ताधारी युती सरकारच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरु झाल्या असून राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना खुशखबर देत, तीन टक्क्यांनी महागाई भत्त्यात वाढ केली आहे. आता सरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नऊ टक्क्यांवरुन बारा टक्के झाला आहे. ही माहिती अर्थ आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

8 जुलै 2019 रोजी राज्य सरकारच्या अर्थ विभागाकडून जारी झालेल्या पत्रकात नमूद केले आहे की, 1 जानेवारी 2019 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर 9 टक्क्यावरुन 12 टक्के करण्यात यावा. त्याचबरोबर महागाई भत्त्याची वाढ 1 जुलै 2019 पासून रोखीने देण्यात यावी. त्याचसोबत या पत्रकात 1 जानेवारी 2019 ते 30 जून 2019 या सहा महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश दिले जातील, असे नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment