राज ठाकरे-सोनिया गांधींच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधान


नवी दिल्ली – काल संध्याकाळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची मनसे प्रमूख राज ठाकरे यांनी भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी सोनिया गांधींची तोंडावर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेली भेट खूप महत्वपूर्ण आहे.

काल सकाळी निवडणूक आयुक्तांची राज ठाकरेंनी भेट घेतली होती. त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाकडे विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता असल्याने आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, अशी मागणी केली. दरम्यान मला निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले आहेत.

जाहीर सभांमधून मोदींच्या भाषणाचे जुने व्हिडिओ आणि प्रत्यक्ष परिस्थिती राज ठाकरे यांनी दाखवली होती. त्यांचे ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे वाक्य देखील खुप गाजले होते. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र प्रत्यक्ष निकालांमध्ये त्याचा फारसा परिणाम दिसून आला नव्हता.

Leave a Comment