यंदाच्या विश्वचषकात होणार अंडर-१९ विश्वचषकाच्या उंपात्यफेरीची पुनरावृत्ती


मुंबई : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाले असून भारताचा पहिल्या उपांत्य फेरीमध्ये सामना न्यूझीलंडशी होणार आहे. तर इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचा मुकाबला दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये होणार आहे. पण विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.

दुसऱ्यांदा विश्वचषक उपांत्य फेरीमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया आणि केन विलियमसनच्या नेतृत्त्वाखालील न्यूझीलंड आमने-सामने उभे ठाकणार आहेत. २००८ मध्ये अंडर-१९ विश्वचषकमध्ये याच दोघांच्या नेतृत्त्वाखाली भारत आणि न्यूझीलंडमध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगला होता. सध्या सोशल मीडियावर त्यावेळेच्या या दोन कर्णधारांचे छायाचित्र व्हायरल होत आहे. साऱ्यांनाच त्यावेळेच्या सामन्याची आठवण येत आहे.

अंडर-१९ च्या त्या सामन्यामध्ये केवळ हे दोन कर्णधारच नव्हे तर रवींद्र जडेजा, ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीदेखील खेळले होते. केन विलियमसनला त्या उपांत्य फेरीमध्ये विराट कोहलीने आऊट केले होते. तर टीम साऊदीने विराट कोहलीला माघारी धाडले. अंडर-१९ च्या त्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा विजय झाला होता. त्यामुळे आताही भारतच बाजी मारेल, अशी क्रिकेट चाहत्यांची आशा आहे.

Leave a Comment