…तर उपांत्यफेरी न खेळताच अंतिम फेरीत जाऊ शकते टीम इंडिया


मँचेस्टर – आता अंतिम टप्प्यात आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पोहचली असून त्यातच उपांत्य फेरीत कोणते चार संघ खेळणार यावरुन देखील पडदा दुर झाला आहे. मंगळवारी भारत आणि न्यूझीलंड तर गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. भारतीय आणि न्यूझीलंड संघाचे चाहते मंगळवारी होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी कमालीचे आतूर झाले आहेत. पण, या सामन्याचा आनंद त्यांना कदाचित घेता येऊ शकणार नाही. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या चाहत्यांचाही यामुळे हिरमोड होऊ शकतो. कारण भारतीय संघ हा सामना एका कारणामुळे उपांत्यफेरी न खेळता थेट अंतिम फेरी खेळू शकतो.

या मागे भारत आणि न्यूझीलंड सामन्यामध्ये पावसाची शक्यता असल्याचे कारण आहे. या उपांत्यफेरीच्या सामन्यासाठी आणि अंतिम सामन्यासाठी ‘राखीव दिवस’ आयसीसीने ठेवला आहे. पहिल्या दिवशी जर पावसामुळे सामना वाया गेला तर दुसऱ्या दिवशी तो आहे तिथपासून पुन्हा सुरु होईल. पण दुसरा दिवसही पावसाने वाया घालवला तर भारताचे गुण जास्त असल्यामुळे तो थेट अंतिम फेरीत दाखल होईल.

पावसामुळे यंदाची विश्वचषक स्पर्धा ही चर्चेत राहिली आहे. या स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंडमधील सामना पावसामुळे वाया गेला होता. शिवाय, काही सामने नाणेफेक न होताच रद्द झाले आहेत. काही संघाना गुणांसाठी महत्वाचे असणारे सामनेही पावसाने वाया घालवले आहेत.

Leave a Comment