अखेर प्रदर्शित झाले साहोमधील ‘सायको सैयां’


आपल्या आगामी चित्रपट साहोमुळे बाहुबली फेम प्रभास सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांच्या मनातील अजूनच ताणली गेली आहे. त्यातच आता या चित्रपटातील ‘सायको सैयां’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. श्रद्धा कपूर आणि प्रभासची जबरदस्त केमिस्ट्री आपल्याला या गाण्यात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे सुजित दिग्दर्शक असून या चित्रपटाचे निर्माते वाम्सी आणि प्रमोद हे आहेत.

ध्वनी भानुशाली आणि सचेत टंडन यांनी हे गाणे गायले असून हे गाणे तनिष्क बाग्चीने लिहिले आहे. ह्या गाण्याची निर्मिती गुलशन कुमार आणि भूषण कुमार निर्मित युव्ही क्रिएशनसह टी-सिरीजने केली आहे. या गाण्याचा टीजर 5 जुलैला रिलीज करण्यात आला होता. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद या गाण्याला मिळाल्यामुळे ह्या गाण्याची उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये तितकीच वाढली होती. श्रद्धा कपूर आणि प्रभास ह्या गाण्यामध्ये बेभान होऊन नाचताना दिसत आहे.

अभिनेता नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्यासारखे कलाकार साहो चित्रपटात मुख्य भुमिका साकारताना दिसणार आहेत. येत्या 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment