काँग्रेसला राजीनामा सत्राचे ग्रहण


नवी दिल्ली – काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर राजीनामा सत्र काँग्रेसमध्ये सुरू झाले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिव पदाचा राजीनामा काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिला आहे. त्यांनी राजीनाम्याची माहिती ट्विटरवरून दिली. तत्पूर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला होता.

मी जनतेचा निर्णय मान्य करत लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत असून माझ्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिव पदाचा राजीनामा मी राहुल गांधींकडे सोपवला आहे. माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि पक्षासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे सिंधिया यांनी म्हटले आहे.

Leave a Comment