येत्या स्वातंत्र्यदिनी बॉक्स ऑफिसवर होणार जोरदार घमासान


येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’, प्रभासचा ‘साहो’ आणि जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हे तीन चित्रपट रिलीज होणार असून ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी एक व्हिडिओ शेअर करीत बॉक्स ऑफिसवर या तीन मोठ्या चित्रपटांची टक्कर होईल आणि तिन्ही चित्रपटांचा व्यवसाय अपेक्षित होणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे.


आपल्या व्हिडिओत तरण आदर्श यांनी म्हटले आहे की, आपण आज १५ ऑगस्टला रिलीज होणाऱ्या तीन चित्रपटांबद्दल बोलणार आहोत. येत्या १५ ऑगस्टला अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’, प्रभासचा ‘साहो’ आणि जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हे तिन्ही चित्रपट रिलीज होणार आहेत. पण प्रश्न हा आहे की सामान्य माणूस आपल्या कुटुंबीयांसह एकाच आठवड्यात असे तीन चित्रपट पाहू शकेल? त्याला ते परवडेल ? असे तीन चित्रपट जेव्हा एकाच दिवशी रिलीज होतात तेव्हा स्क्रिन विभागले जातात, शोज विभागले जातात आणि शेवटी बिझनेस विभागला जातो. बॉक्स ऑफिसवरील द्वंद्व पाहण्यासारखे असेल. दोन मोठे चित्रपट जेव्हा रिलीज होतात तेव्हा दोन्ही चित्रपटांना त्याचा फटका होतो हे आपण पाहिलेच असल्यामुळे एकाचवेळी तीन चित्रपटांची टक्कर टाळता येणे शक्य आहे. पण असे घडेल का हे येणारा काळच ठरवेल.

Leave a Comment