लंडन – टीम इंडियाने माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय आणि टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. धोनी सध्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा वर्ल्ड कप खेळत आहे. त्याने आतापर्यंत चार वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. धोनीच त्यात दोन वेळा कर्णधार होता. आयसीसीने धोनीच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
धोनीच्या सन्मानार्थ आयसीसीने शेअर केला खास व्हिडीओ
जगातील कोट्यवधींना धोनी फक्त नाव नाही तर धोनी एक अशी व्यक्ती आहे ज्याने प्रेरणा दिली असल्याचेही आयसीसीने म्हटले आहे. धोनीच्या बेस्ट फिनिशर खेळीतील क्षण या व्हिडिओत दाखवण्यात आले आहेत. 7 जुलैला धोनीचा वाढदिवस असून आयसीसीने त्यानिमित्ताने हा खास व्हिडिओ शेअर केला आहे.
इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर, अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि भारताचा कर्णधार विराट कोहली धोनीबद्दल आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओत सांगतात. विराट म्हणतो की, भारत आणि त्याच्यासाठी धोनी खास आहे. त्याच्यासोबत फलंदाजी चांगला अनुभव होता. जेव्हा मी संघात आलो तेव्हा धोनी कर्णधार होता आणि तो नेहमीच राहील. धोनीने प्रत्येकवेळी सपोर्ट केला आहे.
🔹 A name that changed the face of Indian cricket
🔹 A name inspiring millions across the globe
🔹 A name with an undeniable legacyMS Dhoni – not just a name! #CWC19 | #TeamIndia pic.twitter.com/cDbBk5ZHkN
— ICC (@ICC) July 6, 2019
विराट म्हणाला की, खूप काही धोनीकडून शिकलो तो माझा नेहमीच कर्णधार असेल. विराटशिवाय जसप्रीत बुमराहनेसुद्धा धोनीबद्दल सांगितले आहे. बुमराह म्हणाला, 2016 ला मी पदार्पण केले धोनी तेव्हा कर्णधार होता. गोलंदाजी करताना धोनी कशी मदत करतो ते बुमराहने सांगितले. वर्ल्ड कपमध्ये धोनीच्या खेळीवरून टीका केली जात होती. त्याने आता निवृत्ती घ्यावी असेही काहींनी म्हटले होतं. खुद्द धोनीने त्याच्या निवृत्तीबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला की, मलाही अजून माहिती नाही मी कधी निवृत्ती घेईन.