सुनील ग्रोव्हरचे अनोखे ‘बॉटल कप चॅलेंज’


अभिनेता सुनील ग्रोव्हर हा नेहमी आपल्या विनोदबुद्धीने चाहत्यांना खळखळून हसवतो. आपल्या कॉमेडी अंदाजाने तो नेहमी काही ना काही धमाल करत असतो. त्यातच सध्या ट्रेण्ड होत असलेले ‘बॉटल कप चॅलेंज’ सुनीलनेही स्वीकारले असून त्याने नेहमीप्रमाणे या चॅलेंजलाही कॉमेडीचा तडका लावला आहे.

हे चॅलेंज ग्रोव्हरने तर पूर्ण केले, पण त्याने आपल्या नेहमीच्याच कॉमेडी अंदाजात पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याने शेअर केलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही.

View this post on Instagram

Mujhse toh haath se hee khul gaya

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover) on


बॉटलचे झाकण उघडण्याचा सर्वात सोपा पर्याय सुनीलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. त्याने हातानेच झाकण उघडुन या व्हिडिओवर मजेदार कॅप्शनही दिले आहे. मुझसे तो हात से ही खुल गया, असे त्याने म्हटले आहे.

या चॅलेंजमध्ये पाण्याच्या अथवा कोणत्याही बटलीचे झाकण आपल्या किकने उघडायचे असते. ते ही बाटली खाली न पडू देता. बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी आत्तापर्यंत हे चॅलेंज यशस्वीपणे पार पाडले आहे. तर, काहींनी मात्र, मजेशीर व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सुष्मिता सेन, रोहमन शॉल, यांनी हे चॅलेन्ज पूर्ण करून चाहत्यांना अचंबित केले आहे.

Leave a Comment