साहोमधील ‘सायको सैय्या’चा टीझर रिलीज


‘साहो’ या चित्रपटाच्या माध्यमातून बाहुबली फेम प्रभास बॉलिवूडमध्ये एन्ट्रीसाठी सज्ज झाला आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात श्रद्धा कपूरही झळकणार आहे. अॅक्शन थ्रिलर असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरपूर्वी या चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकप्रमाणेच श्रद्धा आणि प्रभासचा बोल्ड अंदाज टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.

या गाण्याचे ‘सायको सय्या’ असे बोल असणार आहेत. प्रभासचा आणि श्रद्धाचा धमाकेदार डान्स या गाण्यात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. त्याचबरोबर तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा ३ भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ हा चित्रपटदेखील याचदिवशी रिलीज होणार असल्यामुळे ‘साहो’ला बॉक्स ऑफिसवर टक्कर मिळेल. तसेच या दोन चित्रपटांच्या शर्यतीत जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हा चित्रपटही रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाच्या शर्यतीत बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारतो, हे पाहणे रंजक ठरेल.

Leave a Comment