सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा या जोडीने हसी तो फसी या चित्रपटात पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर ही जोडी आता पुन्हा एकदा लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘जबरिया जोडी’ असे असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता.
बिहारच्या पकडवा विवाह पद्धतीवर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझरही आता रिलीज करण्यात आला आहे. खडके ग्लासी असे शीर्षक असलेले गाणे आज रिलीज करण्यात आले आहे.
तुम्ही पाहिले आहे का ‘जबरिया जोडी’मधील हे गाणे ?
या गाण्याला प्रसिद्ध रॅपर हनी सिंगने आवाज दिला आहे. सिद्धार्थ परिणीतीच्या प्रेमाची झलक आणि अनेक विनोदासोबतच पकडवा विवाह पद्धती या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत सिंग यांनी केले असून येत्या २ ऑगस्टला हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे.