‘प्रस्थानम’च्या मोशन पोस्टरमध्ये संजय दत्तचा नवा अवतार


अभिनेता संजय दत्त हा नुकताच कंलक या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण आता संजय दत्त आता ‘प्रस्थानम’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. २० सप्टेंबरला मल्टीस्टारर असलेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


‘प्रस्थानम’ हा तेलुगुमध्ये गाजलेल्या ‘प्रस्थानम’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. देवा कट्टा हे याचे दिग्दर्शन करीत आहेत. प्रस्थानम, हा एका बाहुबली राजकीय नेत्याची आणि त्याच्या कौटुंबिक नात्याची कथा आहे. मोशन पोस्टर खूपच प्रभावी आहे. सिंहासन या पोस्टरमध्ये रिव्हॉल्वरच्या नळीवर दाखवण्यात आले आहे. राजकारण आणि शक्ती यांचे हे प्रतिक आहे. हे पोस्टर संजय दत्तनेही शेअर केले असून त्यावर ताकत, मोह, प्रेम आणि मानवी मिथ्यांवर आधारित मिळालेला एक वारसा हक्क, असे कॅप्शन दिले आहे. प्रस्थानम २० स्पटेंबर २०१९ ला रिलीज होईल. संजय दत्त, मनिषा कोइराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अली फजल, अमर्या दस्तूर आणि सत्यजीत दुबे यांच्या प्रस्थानम चित्रपटात भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती संजय दत्तच्या प्रोडक्शन अंतर्गत करण्यात येत आहे.

Leave a Comment