सरावाला ‘दांडी’ मारत भारतीय खेळाडूंचा लीड्सच्या रस्त्यावर फेरफटका


लीड्स – भारताचा आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीतील अंतिम सामना श्रीलंकेविरुध्द होणार असून भारतीय खेळाडूंनी या सामन्यापूर्वी सराव सोडून लीड्स शहराची भटकंती केली. याचे काही फोटो हार्दिक पांड्याने आपल्या इंन्स्टाग्रान अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. हार्दिक पांड्या, मयंक अगरवाल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि ‘कुल’ धोनी यामध्ये आपल्या ‘कुल’ अंदाजात दिसत आहे.

View this post on Instagram

Boys’ day out 🤩

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on


बांगलादेशचा पराभव करत भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारल्यामुळे साखळी फेरीतील अंतिम सामन्याला म्हणावे तितके महत्त्व राहिलेले नाही. पण हा सामना जिंकून गुणातालिकेत भारत अग्रस्थानी पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. खेळाडूंनी या सामन्यापूर्वी सराव सोडून शहराची भटकंती केली.

हार्दिक पांड्याने शेअर केलेल्या फोटोत भारतीय खेळाडू लीड्सच्या रस्त्यावर धम्माल करताना दिसत आहे. कुलमॅन धोनीने जॅकेट परिधान केला आहे. तर त्यांच्यासोबत पांड्या, अगरवाल, पंत आणि बुमराह स्माईल करत फोटोला पोज देताना दिसत आहेत.

Leave a Comment