कबीर सिंह पाहण्यासाठी अल्पवयीन मुले करत आहेत आधारकार्डमध्ये छेडछाड


अभिनेता शाहिद कपूरची प्रमुख भुमिका असलेला ‘कबीर सिंह’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र अल्पवयीन मुले हा चित्रपट पाहण्यासाठी आधार कार्डवरील जन्मतारखेमध्ये छेडछाड करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. चित्रपट सुपरहीट ठरला आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र दिल्याने 18 वर्षांखालील मुले हा चित्रपट पाहू शकत नाही.

जयपूरमध्ये असे अनेक प्रकार घडताना दिसत आहेत. एका अल्पवयीन मुलाने अॅपच्या साह्याने आधारकार्डवरील फोटो आणि जन्मतारीख एडिट केली. त्यानंतर त्याला थिएटरच्या गेटवर देखील अडवले गेले नाही. तसेच बुकमाय शो या साईटद्वारे मोठ्या प्रमाणात तिकीट बुक केले जाते. तेथे देखील वय विचारले जात नसल्याचे मुलांनी सांगितले. तसेच, गेटवर अडवल्यावर छेडछाड केलेले मोबाईलमधील आधारकार्ड दाखवल्याने आत सोडले जाते.

मुंबईमधील आयनॉक्सच्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितले की, ‘अल्पवयीन मुले कबीर सिंह बघायला मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने मल्टीप्लेक्स चेनला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी सांगितले की, ‘ए’ प्रमाणपत्र असलेल्या चित्रपटाच्या तिकीटावर एक लाल रंगाची निशाणी लावण्यात आलेली असते. मात्र असे असले तरी देखील अनेक अल्पवयीन मुले टेक्नोलॉजीचा वापर करत ‘कबीर सिंह’ पाहतातच.
21 जूनला रिलीज झालेल्या ‘कबीर सिंह’ने आतापर्यंत 206 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

Leave a Comment