‘जुमानजी: द नेक्स्ट लेवल’चा हिंदी ट्रेलर रिलीज


जुमानाजी हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिलाच असेल यात काही दुमत नाही. या चित्रपटाचे या पुर्वीचे भाग देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यातच आता या चित्रपटाचा पुढचा भाग असलेला ‘जुमानजी: द नेक्स्ट लेवल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. खूपच चित्तथरारक आणि रोमांचित करणारे सीन्स या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील.

जुमानजी खेळाच्या पुढील स्तराची झलक या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आली आहे. 2017 मध्ये आलेल्या ‘जुमांजी:वेलकम टू दी जंगल’ या चित्रपटानंतरची गोष्ट या सिक्वेलमध्ये दाखविण्यात आली आहे. पण तुम्हाला एक ट्विस्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे या खेळाचे मुख्य खिलाड्यांचे दादा (डेनी डेविटो आणि डेनी ग्लोवर) जॉनसन आणि हार्टचे अवतारात खेळात सामील होणार आहे.

थोडक्यात जुनी गँग ‘जुमांजी: द नेक्स्ट लेवल’ मध्ये परत आली आहे, पण खेळ या वेळेस मात्र बदलला आहे. ‘जुमांजी: द नेक्स्ट लेवल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जेक कसदन यांनी केले आहे. या चित्रपटात निक जोनस, मैडिसन इसमैन आणि मॉर्गर टर्नर सुद्धा आहे.

Leave a Comment