मेट्रोमध्येच मांडला या जोडप्याने पिंग पाँगचा डाव


सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असतात. मात्र ज्या व्हिडीओबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहे, तो खास आहे. न्युयॉर्क शहर हे हटके घटनांसाठी ओळखले जाते. हा व्हिडीओ न्युयॉर्क शहरातील मेट्रोमधला आहे. मेट्रोमध्ये मुला-मुलीने असे काही केले की, आजुबाजूचे सर्वच जण त्यांच्याकडे पाहू लागले.

अनेकदा आपण लोकांना मेट्रो अथवा बसमध्ये मोबाईलमध्ये गेम खेळताना पाहत असतो. मात्र या व्हिडीओमध्ये त्या मुला-मुलांनी थेट मेट्रोमध्येच पिंग-पॉग अर्थात टेबल टेनिस खेळण्यास सुरूवात केली. हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला आहे की, याला आतापर्यंत जवळपास 50 लाख लोकांनी बघितला आहे. या व्हिडीओला मैकी केर नावाच्या लेखिकेने ट्विटरवर शेअर केले आहे.


10 सेंकदाच्या या व्हिडीओमध्ये दोघेही जण त्यांच्या खेळांच्या कपड्यात दिसत आहेत. आधीच भरगच्च भरलेल्या मेट्रोमध्ये ते दोघेजण अशाप्रकारे टेबल टेनिस खेळताना पाहून मेट्रोमधील बाकीचे प्रवासी नक्कीच आश्चर्यचकित झाले असतील. अनेक ट्विटर युजर्सनी हा व्हिडीओ शेअर करत भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या.

Leave a Comment