अक्षय कुमारने पूर्ण केले बोटल कॅप चॅलेंज


आपल्या अॅक्शनमुळे बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा सिनेसृष्टीत ओळखला जातोच पण त्याच्या सामाजिक कार्यामुळे देखील तो ओळखला जातो. त्यातच आता एका व्हिडीओमुळे अक्षय कुमार चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियात त्याने शेअर केलेला ‘बोटल कॅप चॅलेंज’चा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ ३८ लाख वेळा पाहिला गेला आहे.


बाटली न पाडता किकने अक्षय कुमारने बाटलीचे बूच उडवण्याचे चॅलेंज घेतले होते. अक्षय या व्हिडिओत राऊंड किकने बाटलीचे बूच अचूक उडवतो आणि बाटली जागेवरच स्थिर राहते हे पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर अक्षयच्या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे.

अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘हे करण्यापासून मी स्वतःला रोखू शकत नाही. या व्हिडिओसाठी माझा आयडॉल जैसनपासून प्रेरणा घेतली आहे. या व्हिडिओतील त्याची क्षमता, अचूकता आणि फिटनेस वाखाणण्याजोगा आहे.

Leave a Comment