त्या आजीबाईंना मॅच पाहण्यासाठी आनंद महिंद्रा देणार तिकीट


भारत आणि बांग्लादेश यांच्या सामन्यात भारतीय संघाचा उत्साह वाढवण्यासाठी एक खास चाहती मैदानात आली होती. 87 वर्षीय चारूलता पटेल या आजीबाई सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरल्या. सामना संपल्यावर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. आता या आजीबाईंचे क्रिकेटबद्दलचे प्रेम आणि उत्साह बघून उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांना विश्वचषकाची तिकीट देणार असल्याचे म्हटले आहे.


चारूलता पटेल यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. स्टेडिअममध्ये तिरंगा हातात घेऊन भारताला प्रोत्साहन देतानाचे त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले. आनंद महिंद्रा यांचे देखील त्यांनी लक्ष आकर्षित केले. आनंद महिंद्रांनी ट्विटरवर लिहिले की, ‘त्यांनी मॅच केवळ त्यांच्यासाठी बघितली. माझ्या परंपरेनुसार मी मॅच बघणार नव्हतो. मात्र केवळ या महिलेला बघून मी मॅच बघणार आहे. त्या एखाद्या मॅच विजेत्या प्रमाणेच वाटत आहेत.’

आंनद महिंद्रांच्या या ट्विटवर एका युजर्सने विचारले की, तुम्ही या महिलेचे तिकीट स्पॉन्सर करणार का, युजर्सच्या या प्रश्नावर त्यांनी देखील आनंदाने होकार दिला.

Leave a Comment