अंबाती रायडूची क्रिकेटमधून निवृती, या देशाने दिली नागरिकत्वाची ऑफर


विश्वचषकात भारतीय संघात अंबाती रायडूच्या ऐवजी विजय शंकरची निवड झाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यावेळी निवड समितीने विजय शंकरची 3डी खेळाडू म्हणून निवड केली होती. मात्र आता विजय शंकर दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. शंकरला दुखापत झाल्याने त्याच्या जागी अंबाती रायडूला बोलवले जाईल असे वाटत होते, मात्र असे झाले नाही. दरम्यान आज अंबाती रायडूनं सर्व क्रिकेटच्या प्रकारतून निवृत्ती जाहीर केली आहे. रायडूने बीसीसीआयला मेल पाठवत निर्णय जाहीर केला आहे. विश्वचषकात भारतीय संघात संधी न मिळाल्याने हा निर्णय घेतले गेल्याचे बोलले जात आहे. हे सर्व घडत असताना, आता एका देशाने थेट रायडूला आपल्या देशाची नागरिकत्व घेण्याची ऑफर केली आहे.

ही नागरिकत्व देण्याची ऑफर दिली आहे आइसलँड क्रिकेट बोर्डाने. ही बाब आइसलँड क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सांगितली आहे. याशिवाय ट्विटमध्ये नागरिकत्व स्विकारण्याचे सर्व नियम-कायदे देखील नमूद करण्यात आले आहेत. मात्र आइसलँड क्रिकेट बोर्डाने किती गंभीरतेने हे ट्विट केले आहे, याबाबत माहिती नाही.

ट्विटमध्ये लिहिण्यात आले आहे की, अग्रवालचे क्रिकेटमध्ये 72.33 च्या सरासरीने 3 विकेट आहेत. त्यामुळे आता अंबाती रायडू 3डी चष्मा काढून टाकू शकतो. आम्ही त्यांच्यासाठी जी कागदपत्रे तयार केलीत ती वाचण्यासाठी केवळ साध्या चष्म्याची गरज आहे. आमच्या बरोबर ये. आम्हाला रायडूशी निगडीत गोष्टी आवडतात. असे ट्विट त्यांनी केले.

रायडूने आतापर्यंत ५५ वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने १६९४ धावा केल्या असून, यांमध्ये १० अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 6 ट्वि20 सामने देखील खेळले आहेत.

Leave a Comment