सोशल मीडियात व्हायरल होत आहे उर्वशी रौतेलाचे वर्कआऊट


बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही अनेकदा आपले वर्कआऊट व्हिडिओज सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यामुळे तिला फिटनेस फ्रीक असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उर्वशीने अलिकडेच आपला नवा फिटनेस व्हिडिओ शेअर केला आहे. ती जीममध्ये वर्कआऊट करताना या व्हिडिओत दिसत आहे. चेस्ट एक्सरसाईज करत असलेल्या उर्वशीने हातात 12-12 किलोचे डंबल्स उचलले आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत उर्वशीने लिहिले की, हा व्हिडीओ 5 वर्कआऊट करणाऱ्या लोकांना टॅग करा. उर्वशी रौतेला मॉडेल असून तिने ‘सिंह साहब द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे 2013 मध्ये आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. तिने त्यानंतर ‘रेस-3’, ‘सनम रे’, ‘भाग जॉनी’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘काबिल’ यांसारख्या चित्रपटात देखील काम केले आहे. पण तिचा आतापर्यंत कोणताही चित्रपट हिट ठरलेला नाही.

Leave a Comment