टीम इंडियाच्या जर्सीच्या वक्तव्यावरुन मेहबूबा मुफ्तींनी मारली पलटी


नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवरुन जोरदार राजकारण सुरू असून विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात इंग्लंडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर या वादात पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनीही उडी घेतली होती. टीम इंडियाला रविवारच्या इंग्लंडविरोधातील सामन्यात भगव्या रंगाच्या जर्सीमुळेच हार पत्करावी लागली, असे ट्विट त्यांनी केले होते. पण नेटकऱ्यांनी त्यांच्या या टि्वटचा सोशल मीडियावर जोरदार समाचार घेतल्यानंतर त्यांनी मी फक्त गंमत केली, असे म्हणत आपल्या वक्तव्यावरुन पलटी मारली आहे.

स्वतःच्या ट्विटचा बचाव करताना मेहबूबा यांनी भाजप कार्यकर्त्याच्या वादग्रस्त ट्विटचे उदाहरण दिले आहे. मुस्लिम महिलांवर सामूहिक बलात्कार करण्याचे आवाहन एका भाजप नेत्याकडून हिंदुंना ट्विटद्वारे केले जाते. पण या ट्विटपेक्षा मी भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल गमतीने केलेल्या ट्विटची जास्त चर्चा होते. जाणीवपूर्व अशी धक्कादायक विधाने दाबली जातात का? एका साध्या ट्विटवर एवढ्या कठोर प्रतिक्रिया येतात पण भाजप नेत्याच्या ट्विटवर संताप का व्यक्त होत नाही? असा सवाल मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे.


मेहबूबा मुफ्ती यांनी मला अंधश्रद्धाळू म्हटले तरी हरकत नाही. मात्र, भगव्या रंगाच्या जर्सीमुळेच टीम इंडियाला रविवारच्या इंग्लंडविरोधातील सामन्यात हार पत्करावी लागली, असे ट्विट केले होते. त्यांच्यावर यावरून जोरदार टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी मी फक्त गंमत केली, असे म्हणत पलटी मारली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटनंतर मेहबूबा यांना मनोरुग्णालयात पाठवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या इतर नेत्यांनीही मेहबूबा यांच्यावर टीका केली होती.

Leave a Comment