इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात चहलच्या नावावर नकोस विक्रम


बर्मिंगहॅम – काल आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लड संघाने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. या सामन्यात भारताचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलने आपल्या १० षटकात ८८ धावा देत एक नकोसा विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे.


विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज चहल हा ठरला आहे. हा विक्रम या आधी भारताचा माजी जलदगती गोलंदाज जवागल श्रीनाथच्या नावावर होता. २००३ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीनाथने ऑस्ट्रेलिया विरूद्ध ८७ धावा दिल्या होत्या.

Loading RSS Feed

Leave a Comment