सोशल मीडियावर नेहमीच बॉलिवूड अभिनेत्रींच्या व्हेकेशनच्या चर्चा सुरू असतात. मलायकाच्या न्यूयॉर्क व्हेकेशनची काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा आहे. पण आता यात मराठी अभिनेत्रीही मागे राहिलेल्या नाही.
‘या’ मराठी अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल
मराठी अभिनेत्री आता अभिनयासोबतच ग्लॅमरच्या दुनियेतही बॉलिवूड अभिनेत्रीच्या बरोबरीने काम करत आहेत. अमृता खानविलकर ही त्यातीलच एक हॉट आणि ग्लॅमरस मराठी अभिनेत्री आहे.
सध्या मालदीवमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर तिची बेस्ट फ्रेंड सोनाली खरेसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
सध्या सोशल मीडियावर अमृताच्या या मालदीव व्हेकेशनचे फोटो व्हायरल होत आहेत. अमृता या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.
आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अमृताने तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
ज्यातील तिच्या मादक अदांनी तिचे चाहते घायाळ होत आहेत. मराठी सिने इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही अमृताने काम केले आहे. तिने आलिया भट आणि विकी कौशलच्या प्रमुख भूमिका असलेल्या राजी चित्रपटात आलियाच्या जावेची भूमिका साकारली होती.
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका जिवलगामध्ये सध्या अमृता काव्या म्हणजेच स्वप्नील जोशीच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. यातील तिची व्यक्तीरेखा काहीशी नकारात्मक असली तरीही अमृताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अमृताने शेअर केलेल्या या सर्व फोटोमध्ये अमृता मालदीवच्या बीचवर धम्माल एंजॉय करत सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे.