‘कबीर सिंह’ नाकारणाऱ्या ताराची चित्रपट हिट झाल्यानंतर अशी होती प्रतिक्रिया


शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी अभिनीत चित्रपट ‘कबीर सिंह’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पाहिल्याच आठवड्यामध्ये चित्रपटाने शंभर कोटींचा व्यवसाय केला असून, प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने चित्रपटाची यशस्वी घोडदौड पुढे सुरूच आहे. अभिनेता आयुष्मान खुराना अभिनीत ‘आर्टिकल 15’ हा चित्रपट जरी यशस्वी ठरत असला, तरी त्या चित्रपटाच्या यशाने देखील ‘कबीर सिंह’चे यश जरासुद्धा फिके पडलेले नाही. ‘कबीर सिंह’च्या भरघोस यशानंतर ‘स्टुडंट ऑफ द इयर-२’ चित्रपटाच्या माध्यामातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री तारा सुतारियाची प्रतिक्रिया काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.


‘कबीर सिंह’मधील नायिकेची भूमिका कियारा आडवाणीला मिळण्यापूर्वी तारा सुतारियाला देऊ केली गेली होती. मात्र ताराने हा चित्रपट करण्यास नकार दिला आणि त्याऐवजी ‘स्टुडंट ऑफ द इयर-२’ हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला होता. या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण साधारण एकाच वेळी सुरु झाले असल्याने हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे ‘कबीर सिंह’ मध्ये भूमिका न स्वीकारता ताराने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ इयर-२’मध्ये भूमिका करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून आलिया भट्ट, वरूण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाला प्रेक्षांकानी भरभरून दाद दिल्याने या चित्रपटाचा सिक्वेलही सुपरहिट ठरणार असे वाटून ताराने या चित्रपटाची निवड केली होती.


मात्र तशी कबुली न देता ताराने ‘कबीर सिंह’च्या यशाचे कारण काही वेगळेच असल्याचे म्हटले आहे. ‘कबीर सिंह’ हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगु चित्रपटाचा रीमेक असल्याने या चित्रपटाला यश मिळणे स्वाभाविकच असल्याचे ताराचे म्हणणे आहे. ‘कबीर सिंह’ ने रविवारपर्यंत १७५ कोटींची कमाई केली असून, भारतामध्ये ३१२३ स्क्रीन्सवर प्रदर्शित होत असलेला हा चित्रपट २०१९ सालामधील आजवर सर्वाधिक ‘ट्रेंडींग’ चित्रपट ठरला आहे.

Leave a Comment