शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोहम्मद शमीने तोडला


बर्मिंगहॅम – भारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात ५ गडी बाद करत एक अनोखा विक्रम केला आहे. विश्वचषक स्पर्धेत सलग तीन सामन्यांमध्ये चारपेक्षा जास्त बळी मिळवण्याचा शाहिद आफ्रिदीचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे. त्याचबरोबर शमी असा विक्रम करणारा जगातील पहिलाच जलदगती गोलंदाज ठरला आहे.

शमीचा विश्वचषक स्पर्धेत भारताकडून एका सामन्यात पाच बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये नंबर ६ वा लागतो. यापूर्वी भारताकडून कपिल देव, व्यंकटेश प्रसाद, रॉबिन सिंह, अशिष नेहरा आणि युवराज सिंह याने केलेला आहे. यापूर्वी पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने विश्वचषक स्पर्धेत सलग तीन सामन्यात चारपेक्षा जास्त गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. शमीने इंग्लंडविरुध्द खेळताना त्या विक्रमाशी बरोबरी केली. पण आफ्रिदी फिरकीपटू होता. तर जलदगती गोलंदात हा विक्रम करणारा शमी पहिलाच खेळाडू ठरला आहे.

Leave a Comment