ऋषभबद्दल असे काही बोलून गेला रोहित त्यामुळे सर्वांना बसला धक्का


बर्मिंगहम : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला इंग्लंडविरोधातील सामन्यात पराभवाचा पहिला धक्का बसला. इंग्लंडने सलग पाच सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताच्या विजयरथाला ब्रेक लावला आहे. भारताचा सेमीफायनल प्रवेश या पराभवाने लांबला आहे. भारताने 7 पैकी 5 सामने जिंकून 11 गुणांसह गुणतक्त्यात दुसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करणाऱ्या भारताला इंग्लंडविरुद्ध मात्र पराभव पत्करावा लागला. स्पर्धेत आतपर्यंत एकही सामना न गमावलेल्या भारताला इंग्लंडने पराभूत करून सेमीफायनलच्या दिशेन एक पाऊल टाकले आहे.

या पराभवानंतर भारतीय संघाच्या फलंदाजांवर अनेक जण नाराज आहेत. कर्णधार कोहलीनेही चांगली फलंदाजी केली असती तर परिणाम वेगळा असता असे मत अनेकांनी व्यक्त केले. पण शतकवीर रोहित शर्मा पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित होता. रोहित शर्माला यावेळी ऋषभ पंत बद्दल विचारले असताना, त्याने असे काही उत्तर दिले की सर्वच हैरान झाले.


पंतविषयी प्रश्न सामन्यानंतर रोहितला विचारण्यात आला होता की, कोहली बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पंतला पाहून तुला आश्चर्य वाटले नाही का? कारण हार्दिक पांड्या सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्याला पंतच्या जागी पाठवायला हवे होते का. रोहितने यावर आपल्या नेहमीच्या मिश्किल अंदाजात उत्तर दिले. रोहित म्हणाला की, मला अजिबात आश्चर्य वाटले नाही, कारण तुम्ही सगळ्यांना वाटते होते की ऋषभ पंतने खेळावे. भारतात तो होता तेव्हापासून ऋषभ पंत कुठे आहे?, असे तुम्ही विचारत होतात. घ्या आता तो आला आहे आणि चौथ्या क्रमांकावर खेळतो आहे. रोहितच्या उत्तरानंतर पत्रकार परिषदेत हशा पिकला.

Leave a Comment