अशुभ भगव्या जर्सीमुळे झाला भारतीय संघाचा पराभव – मुफ्ती सईद


बर्मिंगहॅम – यजमान इंग्लड क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात भारताचा ३१ धावांनी पराभव केला. इंग्लंडने या निर्णायक सामन्यात दमदार खेळ करत स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतावर विजय मिळवला. भारतीय संघाने या सामन्यात प्रथमच भगव्या रंगाची जर्सी घातली होती. त्यामुळे या पराभवाचे खापर भगव्या जर्सीवर सोशल मीडियात फोडण्यात येत आहे.

नेटकऱ्यांच्या संतंप्त प्रतिक्रिया या भगव्या जर्सीवर आल्या आहेत. आयसीसीच्या नियमानुसार विश्वचषक स्पर्धेत एका सामन्यात दोन्ही संघांची जर्सी एकाच रंगाची असल्यास, दोन्ही संघापैकी एका संघाला आपल्या जर्सीच्या रंगात बदल करावा लागतो. म्हणून नियमानुसार भारतीय संघाने इंग्लडविरूद्ध खेळताना भगव्या रंगाच्या जर्सीचा वापर केला.


दरम्यान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करून भगवी जर्सी घालून मैदानात उतरल्यामुळेच टीम इंडियाचा पराभव झाल्याचे तर्कट व्यक्त केले आहे. मला अंधश्रद्धाळू म्हटले तरी चालेल. भगव्या जर्सीनेच भारताच्या विजयी घोडदौडीला लगाम घातला असल्याचे ट्विट मुफ्ती यांनी केले आहे.


त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देणा-या अभिनेत्री हुमा कुरेशीने टीम इंडियाच्या ऑरेंज ब्ल्यू जर्सीवर ट्वीट केले. पण हे ट्वीट करून हुमा ट्रोल झाली. मी अजिबात अंधश्रद्धाळू नाही. पण काय टीम इंडिया ब्ल्यू जर्सी पुन्हा परिधान करू शकते, एवढे म्हणणे पुरेसे आहे…,’ असे ट्वीट तिने केले. तिच्या या ट्विटनंतर लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.

Leave a Comment