इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भगव्या जर्सीत उतरणार टीम इंडिया


नवी दिल्ली – इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पुढील सामना रविवारी यजमान इंग्लंडसोबत होणार आहे. भारतीय संघ या सामन्यात नव्या भगव्या आणि निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे. नुकतेच बीसीसीआयकडून या नव्या जर्सीचे अनावरण ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आले.


भारतीय क्रिकेट संघ इंग्लडविरूद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यात भगव्या आणि निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार विश्वचषक स्पर्धेत एका सामन्यात दोन्ही संघांची जर्सी एकाच रंगाची असल्यास, दोन्ही संघापैकी एका संघाला आपल्या जर्सीच्या रंगात बदल करावा लागतो. भारतीय संघ त्या नियमानुसार इंग्लडविरूद्ध खेळताना भगव्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे.

आयसीसीच्या नियमांनुसार यजमान संघाला आपल्या जर्सीचा रंग बदलता येत नसल्यामुळे इंग्लडच्या जर्सीत कोणताच बदल होणार नाही. फुटबॉलवरुन प्रेरित होऊन आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment