शमीने केलेल्या नक्कलीवर, कॉटरेलने दिले हिंदीमध्ये उत्तर


विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात भारताने इंडिजचा 125 धावांनी दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने शानदार प्रदर्शन करत 4 विकेट घेतले. आपल्या प्रदर्शनाने मोहम्मद शमी चर्चेत आला असला तरीही, मोहम्मद शमी याची सर्वाधिक चर्चा वेस्ट इंडिजचा गोलंदाज शेल्डन कॉटरेल याची नक्कल केल्याने होत आहे. न्यूझीलंड विरूध्द झालेल्या सामन्यात कॉटरेलने विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करताना आर्मीच्या अंदाजात सलाम ठोकला होता. यानंतर कॉटरेल प्रत्येक सामन्यात अशाच प्रकार सेलिब्रेशन करत होता. विश्वचषका दरम्यान केलेले हे सेलिब्रेशन सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.

भारताविरूध्दच्या सामन्यात कॉटरेल बाद झाल्यावर मोहम्मद शमीने सेलिब्रेशन करताना त्याचीच स्टाईल वापरत आर्मी अंदाजात सलाम ठोकला.

मॅच दरम्यान 30व्या षटकात कॉटरेल युजवेंद्र चहलच्य गोलंदाजीवर बाद झाला. बाद झाल्यानंतर कॉटरेल पैवेलियनकडे जात असताना त्यांच्याच अंदाजात शमीने सेलिब्रेशन केले. शमीच्या या सेलिब्रेशनवर कॉटरेलने देखील हिंदीमध्ये ट्विट करत उत्तर दिले. कॉटरेलने लिहिले की, ‘महान मज्जा, महान गोलंदाजी, नकल करणे सर्वात मोठी चापलुसी आहे.’


विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील दोन सामन्यात शमीने आठ विकेट घेतल्या असून, अफगाणिस्तानविरूध्दच्या सामन्यात शमीने हॅट्रिक साधली होती.

Leave a Comment