‘सुपर ३०’मधील ‘बसंती नो डान्स’ गाणे रिलीज


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित ‘सुपर ३०’ हा चित्रपट येणार आहे. अभिनेता हृतिक रोशन या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्याचबरोबर या चित्रपटातील काही गाणी देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता नुकतेच या चित्रपटातील आणखी एक गाणे रिलीज करण्यात आले आहे.

या गाण्याचे ‘बसंती नो डान्स’ असे शीर्षक असून हे गाणे इंग्लिश आणि हिंदी भाषेत मिश्रित आहे. हृतिक मुलांच्या मनातील इंग्लिशविषयीची भीती काढण्यासाठी त्याच्या विद्यार्थ्यांना होळीच्या दिवशी इंग्लिशमध्ये गाण्यास सांगतो. ही मुले हाच प्रयत्न करताना हिंदी आणि इंग्लिश मिश्रित गाणे गाताना या गाण्यात दिसत आहेत.

हृतिक गाण्याच्या शेवटी जगात असे खूप दरवाजे आहेत, जे यामुळे उघडत नाहीत कारण लोक मे आय कम इन इंग्लिशमध्ये म्हणत नाहीत, असा डायलॉग म्हणताना दिसत आहे. जनार्दन धातराक, दिव्या कुमार आणि चैताली परमार यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. दरम्यान १२ जुलैला ‘सुपर ३०’ चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment