रिलीज झाले सिद्धार्थ-परिणीतीच्या ‘जबरिया जोडी’चे मोशन पोस्टर


सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा ही जोडी ‘हसी तो फसी’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र झळकणार आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘जबरिया जोडी’ असे असून या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.


सरप्राईज पार्टीबद्दल तुम्ही आतापर्यंत अनेकदा ऐकले असेल, पण या मोशन पोस्टरमध्ये हे सरप्राईज लग्न आहे, अशी वाक्य ऐकायला मिळतात. सिद्धार्थ आणि परिणीती या पोस्टरमध्ये एका लग्नाच्या वरातीत दिसत आहेत. पण यात नवरदेव खुर्चीवर बसला असून त्याला बांधून ठेवण्यात आले आहे. तर दुल्हा नंबर ४६ असे फलक त्याच्या गळ्यात बांधण्यात आले आहे.

प्रशांत सिंग यांनी सिद्धार्थ आणि परिणीतीच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून सोमवारी म्हणजेच १ जुलैला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. तर हा चित्रपट २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment