हे काय बोलून गेले संजय मांजरेकर धोनीबद्दल


माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे समालोचन करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संजय मांजरेकर यांना उत्कृष्ट समालोचक म्हणून ओळखले जाते. मात्र समालोचन करताना धोनीबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे मांजरेकर यांच्याविरूध्द एका नाराज क्रिकेट चाहत्याने थेट आयसीसीलाच पत्र लिहिले आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात समालोचन करत असताना मांजरेकर यांनी ‘स्टंप्सच्या मागे आमचा रक्षक’, असा उल्लेख केला. समालोचना दरम्यान ‘आमचा’ शब्द वापरणे हे पक्षपातीपणा दर्शवतो. याचाच विरोध करत एडी कुमार या क्रिकेट फॅनने आयसीसीला पत्र लिहिले.


आयसीसीला पाठवलेल्या पत्रात एडी कुमारने लिहिले की, ‘आयसीसी, ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातून माझे अभिवादन स्विकार करा. संजय मांजरेकर यांच्याबद्दल मी बोलू इच्छितो. समालोचन करताना मी त्यांना पुर्णपणे पक्षपाती मानतो. याबद्दल तुम्ही काही कराल का ? याच बरोबर शानदार विश्वचषकासाठी तुमचे धन्यवाद.’

एडी कुमारने पत्राचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला. त्याच्या या पत्रावर क्रिकेट फॅन्सकडून देखील सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. तसेच, फॅन्सने संजय मांजरेकर यांना कोणत्याही खेळाडूचा पक्ष न घेण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Leave a Comment