अद्यापही टीम इंडिया धोनीच्या भरवशावर, विराटने केला खुलासा


मॅंचेस्टर : भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत सलग पाचवा विजय नोंदवत सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. विराट सेनेने मॅेचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजसमोर 269 धावांचे आव्हान ठेवले होते, यात कर्णधार विराट कोहलीने 72 धावांची खेळी केली तर, महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या दोन षटकात आक्रमक फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने शमीच्या 4 विकेट, बुमराह आणि चहलच्या 2 विकेट याच्या जोरावर वेस्ट इंडिजला 143 धावांतच गुंडाळले. विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला असला तरी, त्याने महेंद्रसिंह धोनीला विजयाचे श्रेय दिले. विराट कोहलीने या सामन्यानंतर बोलताना धोनीवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले.

विराट कोहलीने वेस्ट इंडिजवर 125 धावांनी विजय मिळवल्यानंतर धोनी हा भारतीय संघाचा सर्वात मोठा फिनीशर असल्याचे मत व्यक्त केले आहे. विराट कोहलीने सामन्यानंतर, धोनीच्या अनुभवाचा आम्हाला नेहमीच फायदा होतो. धोनी जेव्हा खेळत नाही तेव्हा त्याच्यावर टीका करतात पण आम्ही सर्व त्याच्यासोबत आहोत. धोनीने भारतीय संघाला असंख्य सामने जिंकवले आहेत, असे मत व्यक्त करत टिकाकारांना सडेतोड उत्तर दिले.

सामन्यानंतर धोनीच्या अनुभवामुळे टीम इंडियाला फायदा होत असल्याचे मत विराट कोहलीने व्यक्त केले. तसेच, सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला जेव्हा 15-20 धावांची गरज असते, तेव्हा धोनी आपल्या आक्रमक फलंदाजीने ते करतात. धोनीला कधी आक्रमक फलंदाजी करायची आणि कधी नाही हे माहित असल्यामुळे आम्ही निश्चिंत असतो, असेही सांगितले

भारतीय संघासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा महत्त्वाचा आहे. आम्हाला धोनी संदेश पाठवतो की मैदान कसे आहे, स्कोअर किती असेल. जर धोनीने सांगितले की 265 धावा होतील असे सांगितले तर आम्ही 300 धावा करण्याच्या भागनडीत पडत नाही, असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले.

Leave a Comment