आता चंद्राबाबूंचे राहते घराही जगन मोहन रेड्डींच्या रडारावर


नवी दिल्ली – सत्तेत असताना आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी बनविलेल्या प्रजा वेदिका इमारतीवर वायएसआर काँग्रेस प्रमुख आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी बुडलडोजर फिरवल्यानंतर नायडू यांच्या निवास्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाद निर्माण झाला आणि त्यांना आता त्यांचे सध्याचे निवासस्थान रिक्त करण्यासाठी आंध्र प्रदेश शहर विकास प्राधिकरणने नोटीस बजावली असल्यामुळे चंद्राबाबू नायडू यांची डोकेदुखी वाढली आहे.

आंध्र प्रदेश शहर विकास प्राधिकरणाने त्यांना नोटीस बजावत कृष्णा नदीकाठी घरांची निर्मिती विनापरवाना करण्यात आली असून नदी संवर्धन कायद्याचे यामुळे उल्लंघन होत असल्यामुळे ही नोटीस देण्यात आल्या असल्याचा सांगण्यात येत आहे. तसेच सात दिवसाच्या आत नोटीसला उत्तर दिले नाहीतर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा विकास प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Comment